गाव काठी. तालुका धडगाव. जिल्हा नंदुरबार आठशे वर्षांची परंपरा असलेल्या या होळीच्या आयोजनाचं आणि यशाचं श्रेय कोणीही घेत नाही. कुणाला निमंत्रणही दिल जात नाही. तरी काठीच्या या होळीत सहभागी होण्यासाठी तीस हजारांहून अधिक आदिवासी येतात. आदिवासी राजे, राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव १२४६ साली सुरु केल्याचं म्हटलं जातं. तो बघण्यासाठी जगभरातले पर्यटक गर्दी करतात. १२ मार्चच्या सूर्यास्तापासून १३ मार्चच्या सूर्योदयापर्यंत या उत्सवाची क्षणचित्रं टिपली.