–
दक्षिण सोलापुरातलं औज मंद्रूप इथलं उंबरजे कुटुंब . या कुटुंबात अातापर्यत एक-दोन नव्हे तर तब्बल ४० जण शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातले सदस्य परदेशातही कर्तव्य बजावत असून ‘अधिकाऱ्यांचं कुटुंब’ असाच या कुटुंबाचा नावलौकिक आहेत. विशेष म्हणजे कुटुंबातला सदस्य प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.
अर्जुनाप्पा उंबरजे यांना, रामचंद्र, निलप्पा, गुरुसिद्धप्पा, भीमाशंकर आणि रेवप्पा अशी पाच मुलं . त्यावेळी त्यांनी फारसं शिक्षण घेतलं नाही. परंतु त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. त्यांनी त्यांच्या मुलांना चांगलं शिकवलं.
या मुलांमध्ये प्रसिद्ध श्रीकृष्ण उंबरजे हे पहिले वकील. तर गिरीश उंबरजे- नि. सहायक पोलीस आयुक्त, (सोलापूर). बसलिंग उंबरजे- नि. पोलीस निरीक्षक, मुंबई अाणि चिदानंद उंबरजे नि. पोलीस निरीक्षक, (मुंबई) . त्यानंतर पुढल्या पिढीनं तर प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
अधिकाऱ्यांप्रमाणेच औज ग्रामपंचायतच्या राजकारणातही कुटुंबाचे सदस्य सक्रिय आहेत. अरविंद उंबरजे उपसरपंच
अनिता उंबरजे ग्रामपंचायत सदस्य, नैना उंबरजे ग्रामपंचायत माजी सदस्य अाहेत. कुटुंबातले काही प्रगत शेतकरी आहेत. कुटुंबातल्या महिलाही कर्तृत्ववान आहेत. आताच्या पिढीतले ऐश्वर्या, अभिषेक, क्षितिज , भाग्यश्री, रवीकुमार अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहेत. अमोल उंबरजे सामाजिक कार्यात सक्रिय असून सस्टेनेबिलिटी इनिशिएटीव्हीज आणि महा एनजीओ फेडरेशनच्या काम करत आहेत. ”माझे पणजोबा, आजोबा, वडील आणि काकांनी खूप कष्ट करून मुलांना शिकवलं. अशा कुटुंबाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे.” अमोल सांगतात.
कुटुंबातले सदस्य –
महेंद्र उंबरजे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर, हरीश उंबरजे- निदेशक/ डायरेक्टर, सेंटर वॉटर कमिशन, पुणे, विनोद उंबरजे- सहायक वाहतूक निरीक्षक, RTO सातारा, काशिनाथ उंबरजे नि. सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर, भीमाशंकर उंबरजे नि. आस्सेसर आणि कलेक्टर, मुंबई महानगरपालिका, मल्लिकार्जुन उंबरजे – नि. उपविभागीय पोलीस अधिकारी गृह पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण, निलप्पा उंबरजे सहायक अभियंता सिव्हिल, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर, चेतन उंबरजे – आययडीबीआय बँक मॅनेजर, विनय उंबरजे- अभियंता, मुंबई महानगर पालिका, राकेश उंबरजे- मार्केटिंग हेड, महेश उंबरजे – डॉक्टर, सौदी अरब ,सतीश उंबरजे उपकार्यकारी अभियंता, एमएसईबी पुणे, राजू उंबरजे – तांत्रिक विभाग एमएसईबी सोलापूर, शरद उंबरजे – शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग सोलापूर, शशिकांत उंबरजे वकील सोलापूर, गंगाधर उंबरजे आरोग्य विभाग सोलापूर, पुंडलिक उंबरजे नि. वाहतूक नियंत्रक, रोपम, सोलापूर, यशवंत उंबरजे- अभियंता, सातारा, भालचंद्र उंबरजे- संगणक अभियंता, नगरपरिषद अहमदनगर, सागर उंबरजे – पीएनबी बँक मॅनेजर, अजिंक्य उंबरजे- सिव्हील अभियंता व लेक्चरर, वास्तुविशारद कॉलेज सोलापूर, अंबिका उंबरजे प्र. मुख्याध्यापिका, ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा पुणे,
सतीश उंबरजे – प्रशासकीय अधिकारी, न्यु इंडिया इन्शुरन्स, मुंबई
अरविंद उंबरजे- मुख्याध्यापक, तुळजापूर, नैना उंबरजे – उद्योजिका, रवी उंबरजे – नि. एक्साइज निरीक्षक, मुंबई, शिवशंकर उंबरजे – आदर्श शिक्षक, ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा सोलापूर, चंद्रकांत उंबरजे – मुख्याध्यापक, ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा सोलापूर, कांचन उंबरजे – डॉक्टर, लंडन, राजकुमार उंबरजे – आदर्श शिक्षक, सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर, कै. कल्याण उंबरजे- उद्योगपती, मुंबई, कै. अनिल उंबरजे – मुख्यध्यापक, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर, सूर्या उंबरजे- वकील, वैभव उंबरजे – मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र सविता उंबरजे – अभियंता, मुंबई महानगर पालिका, मोहन उंबरजे – नि. मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमोल उंबरजे – वरिष्ठ समन्वयक, सामाजिक क्षेत्र, पुणे, सुभाष उंबरजे, नि. बँक मॅनेजर, नागनाथ उंबरजे – पोलीस पाटील.
अमोल सीताफळे, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर