गृहपाठ हवा की नको
शाळेने गृहपाठ द्यावा की नको या विषयावर गेले 3-4 दिवस चर्चा होते आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचंही आपण वाचतो आहोत. तर पालकांना, शिक्षकांना याविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायचा नवी उमेदच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. त्यातून समोर आलेल्या या काही प्रतिक्रिया…
आजच्या व्हिडिओत नाशिकच्या डॉ. हर्षदा देशपांडे.

आजच्या व्हिडिओत नाशिकच्या डॉक्टर आणि एका मुलीची आई असलेल्या हर्षदा देशपांडे. गृहपाठ दिला पाहिजे या बाबत त्या आग्रही आहेत. त्यांच्यामते गृहपाठामुळे शाळेत काय चाललं आहे ते समजतं. शिवाय गृहपाठ नसेल तर मुले टीव्ही, मोबाईलच्या जास्त आहारी जातील. मुलांचा सराव देखील महत्वाचा असतो तो गृहपाठातून होतो असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकूया त्या काय म्हणतात –

Leave a Reply