हात काळे करणाऱ्या व्यवसायातून समृध्दी

परांडा रोडलगत अनाळा इथला दुमजली बंगला. हा बंगला आपलं लक्ष वेधून घेतो ते त्यावरचा ट्रॅक्टरमुळे. अंधारातही या ट्रॅक्टरचे दिवे सुरू असतात. हा बंगला अशोक भिलारे यांचा. 

काही वर्षापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून परंडा तालुक्याची ओळख होती.सिंचन प्रकल्पांमुळे चित्र पालटलं.   ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असूनबागायती क्षेत्र झपाट्यानं  वाढत आहेसाहजिकच शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर आणि मागणी वाढलीनेमक्या याच काळात पांढरेवाढी (ता.परंडायेथील अशोक भिलारे यांना रोजगाराची गरज होतीत्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर दुरूस्तीच्या क्षेत्रात पाऊल टाकलंखरंतर गॅरेजचा व्यवसाय म्हणजे हात काळे करावे लागतातत्यात कष्टाला अंत नाही.पण भिलारे यांनी हाच व्यवयास निवडला

कौटंुबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडे गॅरेज टाकण्यासाठी भांडवलस्वत:ची जागा नव्हती.  पण मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी अनाळा इथं  परंडा रोडलगत ७० हजारात दोन गंुठे जागा खरेदी केली छोटंसं  गॅरेज सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे ट्रॅक्टरच्या दुरूस्तीची कामं  वाढत गेलीरात्री दोनतीन वाजेपर्यंत दुरूस्ती करत त्यांनी कठोर परिश्रम घेतलेपुढे त्यांच्या कष्टाला फळ मिळत गेलंहळहळू त्यांनी दुकानाचा विस्तार केलात्यांनी दुकानालगत टप्प्याटप्प्यानं  दीड एकर जमीन खरेदी केलीजागेत ४६ बाय ४८ जागेवर  घर बांधलंकाही वर्षांपूर्वीच त्यांनी अनाळालगत मलकापूर शिवारात सात एकर जमीन खरेदी केलीही जमीन बागायत करण्यासाठी त्यांनी इनगोंदा तलावावरून म्हणजे तीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन केलीया जमिनीत ते ऊस लागवड करणार आहेत.

बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना स्वत:चा आणि व्यवसायाचा अभिमान आहे.

अशोक भिलारे यांनी त्यांच्या बंगल्याच्या बांधकामादरम्यान दुसऱ्या मजल्यावरील टॉवरवर स्लॅब टाकलाजेणेकरून त्यावर अवजड ट्रॅक्टर सहज उभारता येऊ शकेलज्या ट्रॅक्टर दुरूस्तीतून जीवन बदलले त्या ट्रॅक्टरचा योग्य सन्मान झाला पाहिजेया भावनेतून भिलारे यांनी ट्रॅक्टरला घराच्या उंच भागी स्थान दिलंया बंगल्यातच त्यांचं  ट्रॅक्टर गॅरेज असून,सहा मुलं  कामावर आहेत.

 आपण ट्रॅक्टरलाच लक्ष्मी मानतो म्हणून नवीन बंगल्यावर ट्रॅक्टर ठेवण्याची इच्छा होती.सुरूवातीला सिमेंटचा ट्रॅक्टर राशीन(नगर) इथून  बनवून आणण्याची योजना होतीमात्र, नंतर खराखुरा ट्रॅक्टर असावा, असं  वाटल्यामुळे १ लाख ९ हजार रूपये किंमतीचा जुना ट्रॅक्टर त्यांनी आणला११ हजार रूपये खर्चून बार्शीवरून क्रेन मागवलेक्रेनने घरावर ट्रॅक्टर ठेवला आणि  त्यानंतर त्याला रंगकाम केलंबॅटरीसह सजावटीचा खर्च दोन लाखापर्यंत गेला  ”दररोज १५ मिनिटे ट्रॅक्टर सुरू ठेवतो,ट्रॅक्टरचे दर्शन घेतो,” असं भिलारे सांगतात. 

परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर दुरूस्तीचं  प्रशिक्षण घेतलंकंपनीत काम केलं आणि मग  स्वत:चं  गॅरेज सुरू केलं दिवस पालटलेपण ज्या व्यवसायातून त्यांनी समृध्दी साधली त्या व्यवसायाबद्दल कमालीचा अभिमान जपण्यासाठी हे केल्याचं ते सांगतात. 

चंद्रसेन देशमुखउस्मानाबाद

Leave a Reply