Performance of Women MLAs/महिला आमदारांची कामगिरी

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची कामगिरी

विधानसभेत महिला आमदारांनी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सामाजिक विषयवार संख्या आणि अन्य माहिती. 

माहितीस्त्रोत: विधिमंडळाचं संकेतस्थळ आणि उपलब्ध झालेले अहवाल, २०१४ ते १८ या काळातील  सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८) त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न, ज्यात मा आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे.

क्र आमदाराचे नाव / पक्ष / मतदारसंघ एकूण प्रश्न आरोग्य शिक्षण पाणी शेती बेरोजगारी बालक महिला उपस्थितीची सरासरी %
यशोमती ठाकूर,कॉ / तिवसा, अमरावती ९५ १२ १५ ६८
मेधा कुलकर्णी,भाजप / कोथरूड, पुणे ८१ ९५
निर्मला गावित,कॉं /इगतपुरी, नाशिक ६५ ८०
प्रणिती शिंदे,कॉं /सोलापूर शहर मध्य, सोलापूर ६१ ७४
सीमा हिरे, भाजप/ नाशिक पश्चिम, नाशिक ६० ७७
अमिता चव्हाण,कॉं / भोकर, नांदेड ५८ ६८
वर्षा गायकवाड, कॉं / धारावी, मुंबई ५८ ८९
संध्या देसाई कुपेकर, राकॉं/ चंदगड, कोल्हापूर ४० ६१
मनिषा चौधरी, भाजप/ दहिसर, मुं उपनगर ३५ ९९
१० दीपिका चव्हाण, राकॉं/ बागलाण, नाशिक ३२ १००
११ ज्योती कलानी, राकॉं/ उल्हासनगर, ठाणे २९ ६९
१२ तृप्ती सावंत, शिवसेना/ वांद्रे पूर्व, मुं उपनगर २२ ९५
१३ देवयानी फरांदे, भाजप/ नाशिक मध्य, नाशिक १९ ८६
१४ मंदा म्हात्रे, भाजप / बेलापूर, ठाणे १२ ६९
१५ डॉ भारती लव्हेकर,भाजप /वर्सोवा,मुं उप १२ ९२
१६ माधुरी मिसाळ,भाजप /पर्वती, पुणे १० ७५
१७ मोनिका राजाळे,भाजप / शेवगाव,अहमदनगर ६७
१८ संगीता ठोंबरे, भाजप/ केज, बीड ८१
१९ सुमन पाटील, राकॉं / तासगाव, सांगली ६६
२० स्नेहलता कोल्हे, भाजप/कोपरगाव,अहमदनगर ९०
२१ पंकजा मुंडे / भाजप / परळी:   मंत्री प्रश्न- उपस्थितीची नोंद लागू नाही.                  
२२ विद्या ठाकूर / भाजप / गोरेगाव: मंत्री उपस्थिती व प्रश्न यांच्या नोंदी लागू नाहीत.                  

    निरिक्षणे

  • २२ महिला आमदारांपैकी २ मंत्री आहेत.
  • महिला आमदारांत सर्वाधिक एकूण प्रश्न विचारणार्‍या आमदार यशोमती ठाकूर. त्यांची प्रश्नसंख्या ९५ आहे. अभ्यासविषयांत पाणीविषयक १२ आणि शेतीविषयक १५ असे सर्वाधिक प्रश्नही त्यांचेच.
  • एकूण प्रश्नांत दुसर्‍या क्रमांकाची ८१ ही प्रश्नसंख्या आमदार मेधा कुळकर्णी यांची आहे.
  • आरोग्य आणि शिक्षणविषयक सर्वाधिक  प्रत्येकी ७ प्रश्न आमदार प्रणिती शिंदे  यांनी मांडले.
  • बालकांविषयी सर्वाधिक ८ प्रश्न आमदार वर्षा गायकवाड यांनी आणि महिलाविषयक सर्वाधिक ४ प्रश्न आमदार दीपिका चव्हाण यांनी उपस्थित केले.
  • महिला आमदारांनी एकूण ६ धोरण विषयक प्रश्न विचारले आहेत. आमदार मेधा कुलकर्णी यांनी ३, तर यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे आणि संध्या कुपेकर यांनी प्रत्येकी एक. 
  • महिला आमदारांनी उपस्थित केलेले,वरील वर्गवारीत नमूद नसलेले घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण प्रश्न ९७. त्यापैकी सर्वाधिक २१ प्रश्न आमदार सीमा हिरे यांनी विचारले.
  • एकूण १६ महिला आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे.  उर्वरित ४ जणींची प्रश्नसंख्या एक अंकी आहे.  सर्वात कमी, म्हणजे १ प्रश्न  आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावे आहे.
  • १०० टक्के उपस्थिती आमदार दीपिका चव्हाण यांची.  विधानसभेच्या सर्व २८८ आमदारांत पूर्ण उपस्थिती असलेल्या त्याच एकमेव आमदार आहेत.