”राहतो त्याच परिसरात लाॅकडाऊनमध्ये अनेकजणांवर उपाशी झोपण्याची वेळ आली. मग आम्ही बचतगटातील महिलाच सरसावलो आणि धान्य जमा करून गरिबांपर्यंत पोहचवण्याची मोहीम सुरू झाली. ‘एक ओंजळ गरिबांसाठी’ असं या मोहिमेचं नाव.” मोरगाव ( ता.बीड) इथल्या बचतगटाच्या सदस्य प्रियंका कागदे सांगत होत्या.
कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये राज्यात झाला. लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक हाल झाले ते हातावर पोट असणा-या गरिबांचे. अनेक कुटुंबांसमोर संकट उभे राहिले.अगदी सुरुवातीच्या काळात काही संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी मदत केली पण बहुतांश मदत शहरातील गरिबांना झाली. गावपातळीवर परिस्थिती कठीण होती. तेव्हा बीड जिल्ह्यात महिला बचतगटांनी गावपातळीवर धान्य संकलन करून वाटल्यानं अनेक गरिबांना मोठा आधार मिळाला.
बचतगटाच्या लिंबागणेश प्रभाग समन्वयक राखी डोंगरे म्हणतात, ” गावपातळीवरच्या बचतगटातील महिलाही काही फार श्रीमंत नसतात. त्याही सामन्य कुटुंबातील असतात.त्यांच्याकडेही या काळात आर्थिक अडचणी होत्याच.पण, त्यांना सामजिक भान होते. आपण आर्थिक मदत कुणाला करू शकत नसलो तरी सर्वांनी मिळून गावात धान्य संकलन केलं तर नक्कीच मोठी मदत होऊ शकेल असा विश्वास त्यांना होता. यातून ‘एक ओंजळ धान्य गरिबांसाठी’ ही मोहीम सुरू झाली.”
जिल्ह्यातील बचतगटांचे काम सांगताना प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे म्हणाले, ” गरिबांसाठीच्या धान्य संकलनाच्या संकल्पनेला जिल्हाभरातील बचतगटांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ११६ गावतील १ हजार ८३ बचतगटांच्या ५ हजार महिलांनी १५० क्विंटल धान्य जमा करून गरिबांना.हे फार मोठं काम होतं”.
या उपक्रमाच्या यशाचं सूत्र बेलखंडी इथल्या ज्योती बजगुडे सांगतात,” आम्ही एक ओंजळ धान्य गावातील नागरिकांना मागितलं आणि हे धान्य परिसरातीलच गरिबांना दिले जाणार असल्याचं सांगितलं. गावातही अनेकांना मदतीची इच्छा असते पण प्रत्येकवेळी आर्थिक मदत शक्य नसते. त्यामुळे गावकरीही यात सहभागी झाले. कुणी एक किलो, कुणी पाच, दहा किलो तर कुणी त्यापेक्षा अधिक धान्य आम्हाला दिलं .यातूनच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून संकलन झालं आणि बचतगटातील महिलाही कोविड काळात मदतीसाठी पुढे येऊन काहीतरी करून दाखवू शकतात हे दिसून आलं. जिल्हा समन्वयक शकील शेख, तालुका समन्वयक रश्मी गोसावी यांनी यासाठी मार्गदर्शन केलं.”
– अमोल मुळे, बीड
Related