काम करण्यास प्रेरणा मिळते आहे
माझं नाव डॉ. रविंद्र बाबूराव ढाकणे असून मी जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी इथं गेली ११ वर्षे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. मला ‘ मस्कूलर डिस्ट्रॉफी (muscular dystrophy) नावाचा आजार आहे. मी पूर्णतः wheelchair bound आहे. माझ्या कामाचा आढावा नवी उमेदवर एका पोस्टद्वारे प्रसिद्ध केला. याला सोशल मिडियातून भरभरून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझा प्रवास इथंच न थांबता मला झी 24 तास वाहिनीवरील ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ या कार्यक्रमात बोलावण्यात आलं. त्यानंतर ‘नूतन गुलगुले’ फाउंडेशनतर्फे ‘ध्येयपूर्ती पुरस्कार’ जाहीर झाला.
‘पोलादी दिव्यांग’ पुस्तकात जीवनचरित्र प्रसिद्ध झालं. त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला “pride of India” पुरस्कार आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. मे 2021 मध्ये ABP माझावर माझ्या कामाची दखल घेण्यात आली.
नवी उमेदवरुन झालेला माझा प्रवास मला अजून जोमाने काम करण्यास प्रेरित करतो. त्यामुळेच आजही मी अजून हुरुपाने काम करतोय.