ठिय्या कामगार

कोरोना आला आणि गेला मात्र गोरगरीबांचे जीवन आणखी बिकट करून गेला. जगण्यासाठी धडपड तेव्हाही सुरू होती आणि आताही आहे. महिला व पुरूष दोघेही खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यावेळी अनेकांचे हातचे काम गेले. कामधंदे ठप्प झाले. शासनाने बऱ्याच उपाययोजना राबवल्या. मात्र त्या सुद्धा त्यांच्यापर्यंत नीट पोहोचल़्या नाहीत. ठिय्या कामगारांना शासनाने ज्या कीट वाटप केल्यात त्या बहुतेकांना मिळाल्याच नाहीत.

ई-श्रम कार्डच्या माध्यमातून सरकारकडून गरीबांच्या खात्यात पैसे टाकले जाणार असा वाजागाजा करण्यात आला. पण अशा योजनांची माहितीही या वर्गाला नसते. हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती रोजच असताना रोज हाताला काम मिळतंच असंही या कष्टकरी वर्गाचं नाही. आठवड्यातून दोन ते तीन दिवस काम मिळते. ५०० ते ७०० रूपये रोजंदारी मिळते. यातही त्यांना कामाचे नियमित व पूर्ण पैसे मिळत नाहीत. नागपुरातल्या ठिय्या कामगारांचीही हीच परिस्थिती. या व्हिडिओतही कामगार काय सांगतात ते ऐकू, बघू.
– नीता सोनवणे,नागपूर.

Leave a Reply