टाइपरायटरची दुनिया
सन १८३२ मध्ये तयार करण्यात आलेले ‘बटरफ्लाय’, अंध व्यक्तींसाठी असलेला ‘ब्रेल’, मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू आणि अरेबिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणकयंत्रसुद्धा! टाईपरायटर्सचे ३८० वेगवेगळे प्रकार. बीडकरांना पाहायला मिळत होते. गेल्याच आठवड्यात लघुटंकलेखक संघटनेचं राज्य अधिवेशन भरलं होतं. त्यात हे प्रदर्शन होतं.
अमित माने यांनी हौसेनं हे टाईपरायटर्स जमवले आहेत. साधारण ७ वर्षांपासून ते हे टाईपरायटर्स जमवत आहेत. ७०० हून अधिक टाईपरायटर्स त्यांच्या संग्रही आहेत.
अमित मुळचे परभणी जिल्ह्यातल्या सेलूचे. सध्या पुण्यात असतात. त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी. जुन्या वस्तू जमवण्याचा त्यांना छंद. कामाच्या निमित्तानं टाईपरायटिंग संघटनेच्या संपर्कात ते आले आणि टाईपरायटरच्या प्रेमातच पडले. युक्रेन आणि अरब देशांमधूनही त्यांनी टाईपरायटर्स मागवले आहेत.
”जुन्या टाईपरायटर्सचं एक संग्रहालय मला पुण्यात उभारायचं आहे.” अमित सांगत होते. ”नागरिकांसाठी ते मोफत ठेवायचा मानस आहे. त्यासाठी कामही सुरू आहे. खर्च बराच आहे पण हौसेला मोल नसतं, खरं.”
प्रत्येक टाईपरायटरची विस्तृत माहिती असलेली पुस्तिकाही त्यांनी तयार केली आहे. प्रत्येक टायईपरायटरचा इतिहास, तो कधीचा आहे, कुठे तयार केला गेला, त्याची वैशिष्ठ्ये, याची फोटोसह माहिती या पुस्तिकेत आहे. प्रदर्शनात ही पुस्तिकाही लोकांना उपयुक्त वाटली.
– अमित माने

Leave a Reply