Latur

दुष्काळग्रस्त मुलांची भागवली तहान-भूक

लातूर जिल्ह्यात दुष्काळात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हाने सर्वांचीच होरपळ होत आहे. या दुष्काळाने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचे तर बालपणच हरवले आहे ...

मेक इन पारधेवाडी

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या ...

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना ...

लातुरातील समानतेचे आगळे रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेचा सण आपल्याकडे पारंपरिक उत्साहात साजरा होता. यामध्ये बहीण- भावाला राखी बांधते, औक्षण करते, गोड- धोड मिठाई खाऊ ...

दुष्काळग्रस्त मुलांची भागवली तहान-भूक

लातूर जिल्ह्यात दुष्काळात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हाने सर्वांचीच होरपळ होत आहे. या दुष्काळाने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचे तर बालपणच हरवले आहे. ग्रामीण भागात विशेषत: बंजारा तांड्यांवरील मुलांची तर अधिकच दयनीय अवस्था आहे.
तांड्यांवर शासनामार्फत चालविले जाणारे हंगामी वसतीगृह बंद केल्यामुळे आणि दुष्काळात कुटुंबाला जगवायचे कसे, या चिंतेने माय-बापासह निम्मी कुटुंबे मजुरीसाठी मुंबई, पुण्यात गेल्याने या मुलांना सकस जेवणही मिळत नाही.

अशा परिस्थितीत अंगभर कपडे नसलेल्या, बोडक्या डोक्याने कळशी, हंडा व घागरी घेऊन पाण्यासाठी उन्हातान्हात पळापळ करताना ही मुले दिसतात. 

Continue Reading…

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. स्वाधारचं वेगळेपण म्हणजे अंधपणाचे भांडवल न करता सन्मानाने अर्थाजन करीत एकमेकांना आधार देत समूहजीवन जगतात. हरिश्चंद्र सुडे हे सर्वांचे पपा तर सविता सुडे या ममा. या दाम्पत्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अंधांना आधार आणि स्वाभिमानही दिला. सविता यांचं मागच्या वर्षी निधन झालं.

पण त्यामुळे खचून न जाता हरिश्चंद्र सुडे स्वाधार सांभाळत आहेत.

Continue Reading…

मेक इन पारधेवाडी

दुर्गम भागात मेडिकल दुकान असेल-नसेल. पण सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवा, या निग्रहाने छाया काम करते आहे. ‘नवी उमेद’वर सॅनिटरी नॅपकिन्सविषयीच्या पोस्ट्स वाचून छाया काकडेने आमच्याशी संपर्क केला.पारधेवाडीच्या (ता.औसा, जि.लातूर) मुली-महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्यासाठी प्रवास आणि वीस-तीस रुपये खर्च करून औशात किंवा लातुरला जावे लागायचे. आज छायाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या ३० रुपयांत सहा नॅपकिन्सचे पाकिट पारधेवाडीतच मिळते.

औसा तालुक्यातील २० टक्के महिला गर्भाशयविकारग्रस्त, बहुतांश विशी-तिशीच्या, मासिक पाळीतील अस्वच्छता, उघड्यावर शौचास जाणे हीच याची कारणे – स्वतःच केलेल्या अभ्यासातले हे निष्कर्ष छायाच्या कामाची प्रेरणा ठरले.

Continue Reading…

लातुरातील समानतेचे आगळे रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेचा सण आपल्याकडे पारंपरिक उत्साहात साजरा होता. यामध्ये बहीण- भावाला राखी बांधते, औक्षण करते, गोड- धोड मिठाई खाऊ घालते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट देतो, शिवाय आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो. पण आजच्या बदलत्या काळानुसार फक्त पुरूषांनी बायकांचे संरक्षण करावे, अशी परिस्थिती आता राहिली नाही. देशाच्या संरक्षणमंत्रीपदी एक स्त्री असताना, स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत.

उलट बऱ्याचदा अचानक आलेल्या संकटाला अगदी सामान्य स्त्रीसुद्धा जास्त धीराने तोंड देते, हे आपण पाहतो. मग त्याही पुरूषांचे संरक्षण करू शकतातच की!“

Continue Reading…