लोहार सर जिथे,शाळा १००%तंबाखूमुक्त होते तिथे !

 

नंदुरबार जिल्ह्यातले शिक्षक कैलास लोहार. सरांची ख्याती अशी की, ज्या शाळेत त्यांची नियुक्ती होते ती शाळा १००% तंबाखूमुक्त होतेच. मुळात इथल्या ग्रामीण भागात तंबाखू हे कोणाला व्यसन वाटतच नाही. त्यामुळे इथलं तंबाखूमुक्तीचं काम कठीणच. ग्रामीण भागातील लोकांची आवड लक्षात घेत भारुड, वासुदेव, गोंधळी, स्त्री पात्र साकारत ते तंबाखूचे दुष्परिणाम समजावतात.
सलाम मुंबई फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून लोहार सरांना या कामासाठी प्रेरणा मिळाली. सर्वप्रथम २०१२ मध्ये तळोदा तालुक्यातली जिल्हा परिषद शाळा दलेलपूर, त्यांनी तंबाखूमुक्त केली. मग सोरापाडा जि. प. शाळा. त्यानंतर आष्टे.


नंदुरबार जिल्हा तंबाखूमुक्त व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही या प्रयत्नांना चालना दिली. सलाम मुंबई फाउंडेशनचे नऊ निकष पूर्ण करून आपली शाळा कशी तंबाखूमुक्त करता येईल यासाठी लोहार सरांनी शिक्षक मित्रांना प्रोत्साहित केलं. आपल्या शाळेसह त्यांनी आसपासच्या गावपाड्यांवर लक्ष केंद्रित केलं. सरांच्या कामासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी आणि तत्कालीन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नंदुबार रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
शाळेतील पाच विद्यार्थ्यांमार्फत पालकांचं तंबाखू व्यसन सोडवण्यासाठी महाराष्ट्र रत्न पुरस्कार. वर्ष २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दरवर्षी भारुडाच्या माध्यमातून लोहार सर युवावर्गात तंबाखूमुक्ती करतात.
कोरोना काळात सरांनी ऑनलाइन माध्यमातून जनजागृती केली.
सध्या ते आष्टे इथल्या जि. प शाळेत मुख्याध्यापक आहेत.

– रुपेश जाधव, ता. तळोदा, जि. नंदुरबार

Leave a Reply