हिंदू मुस्लिम सौहार्दाचे लक्ष्मीपूजन

कोविडच्या लाटेमागे लाटा, त्यातून येणारी भयाण अस्वस्थता यात आपल्या सर्वांची मागची दोन वर्षं गेली. विज्ञानाच्या कृपेने यंदाच्या वर्षावर मात्र कोरोनाचे सावट नाही. त्यामुळेच यंदाच्या वर्षी सर्वच सण- उत्सव अगदी धूमधडाक्यात आणि मोठ्या आनंदात साजरे केले जातायत. त्यातही दिवाळी हा हिंदूंचा वर्षभरातील मोठा सण म्हणण्यापेक्षा, आपण दिवाळीला भारतीयांचा सर्वात मोठ्ठा सण म्हणतो. हाच भारतीयत्वाचा नारा जोपासत पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या मेहबूबभाई पानसरे आणि कुटुंबियांनी यंदाही लक्ष्मीपूजन भक्तीभावाने साजरं केलं. जेजुरीचे पानसरे हे मुस्लिम कुटुंब. मेहबूबभाई पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तर त्यांच्या पत्नी अमिना पानसरे या गेल्या अडीच वर्षांपासूनच्या विद्यमान नगरसेविका. बावीस सदस्यांचे यांचे हे कुटुंब आजही एकत्र कुटुंबपद्धती पाळत एका छताखाली राहतंय. जेजुरीच्या खंडेरायाचे पानसरे हे पिढीजात मानकरी आहेत. त्यांचे पानसरे हे आडनावसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पानसरेंचे आडनाव खरं तर शेख होते, मात्र खंडोबा देवस्थानात या कुटुंबाला पान सुपारीचा मान मिळाल्याने त्यांचे पानसरे हे आडनाव पडले. हे आडनाव त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळालेले आहे, तसा ताम्रपत्रात सुद्धा उल्लेख आहे. मेहबूब पानसरे यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. हे संपूर्ण कुटुंब खंडोबा देवस्थानाचे मानकरी आहेत. पानसरे कुटुंबाकडून खंडेरायाला मानाचा अश्व वाहिला जातो. मेहबूबभाईंचे पूर्वज देवीची घटस्थापना सुद्धा करायचे. नवरात्राची परंपरा आजही या घरात अखंडितपणे सुरु आहे. मेहबूब पानसरे हे उद्योग व्यवसायात उतरल्यानंतर, त्यांचे किराणा दुकान- रूबिना प्रोव्हिजन स्टोअर्स, सुरू झाल्यानंतर त्यांनी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाची परंपरा

Read More