गोष्ट मुक्तीसंग्रामातल्या क्रांतिकारकाची

आजच्या पिढीतल्या किती लोकांना, शाळकरी मुलांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास माहिती आहे का? खरंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण मराठवाड्यातले लोक त्यावेळीही पारतंत्र्यात होते. १७ सप्टेंबर १९४८ म्हणजेच स्वातंत्र्याच्या १३ महिन्यानंतर मराठवाड्यात राहणाऱ्या लोकांनी मोकळा श्वास घेतला. जुलमी निझाम आणि रझाकरांच्या तावडीतून सुटून तेही अखंड भारताचा भाग झाले. मराठवाडा स्वातंत्र्यलढ्यातली महत्त्वाची नावं म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, कॅप्टन जोशी, आ.कृ.वाघमारे, केशवराव कोरटकर, वामनराव नाईक आणि यांच्यासारखेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात लढलेले आणखीही स्वातंत्र्य सैनिकही आहेत. क्रांतीवीर दत्तोबा भोसले हे नाव घेतल्याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. दत्तोबा भोसले यांचा जन्म औसा तालुक्यातील मातोळा या गावी १९ नोव्हेंबर १९१८ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण मातोळा गावी ऊर्दू माध्यमातून झाले. दत्तोबा भोसले म्हणजे लोहाऱ्याजवळच्या हिप्परगा गावातील स्वामी रामानंद तिर्थ मुख्याध्यापक असलेल्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी. नंतर त्यांनी हरीभाई देवकरण हायस्कुल, सोलापूर येथून मॅट्रीकचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते ज्ञानर्जनासाठी सयाजीराव गायवाडांच्या आश्रयाला बडोद्याला गेले. तिथे सयाजीरावांनी स्थापन केलेल्या प्रो राजरत्न माणिकराव यांच्या आखाड्यात कुस्तीचे कित्ते गिरवले व ते त्यांचे पट्टशिष्य झाले. स्वतः महाराजांसोबत कुस्ती खेळण्याची संधी दत्तोबा भोसले यांना मिळाली. त्यांनी संपूर्ण देशभर कुस्तीत वेल्टरवेट व फेदरवेट गटात चॅम्पियनशिप मिळवली. त्याकाळचे प्रसिद्ध जागतिक मल्ल गामा, गुंगा व इमामबक्ष यांच्या बरोबरच्या कुस्त्या गाजल्या. दत्तोबा भोसले हे

Read More

गृहपाठ हवा की नको

शाळेने गृहपाठ द्यावा की नको या विषयावर गेले 3-4 दिवस चर्चा होते आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचंही आपण वाचतो आहोत. तर पालकांना, शिक्षकांना याविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायचा नवी उमेदच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. त्यातून समोर आलेल्या या काही प्रतिक्रिया – आजपासून नवी उमेदवर आजच्या व्हिडिओत उस्मानाबादचे बालरोगतज्ञ डॉ. दिग्गज दापके-देशमुख, उस्मानाबाद

Read More

देशातली सर्वात लहान महिला आयपीएस: नितीशा २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश

नितीशा संजय जगताप. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या भातगळी इथल्या नितीशाचा लोहारावासीयांना अभिमान वाटत आहे. अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या नितीशाचं कुटुंब मूळचं भातगळीचं. नोकरीव्यवसायानिमित्त हे कुटुंब पुढे लातूरला स्थायिक झालं. माणसाच्या प्रगतीसाठी,सक्षमीकरणासाठी शिक्षण हेच माध्यम आहे, यावर नितीशाचे आईवडील संजय आणि अश्विनी यांचा ठाम विश्वास. त्यामुळे सुरुवातीपासून त्यांचं संपूर्ण प्राधान्य नितीशा आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणाला होतं. त्यातूनच नितीशा सहाव्या वर्षांपासून आई व बहिणीसोबत पुण्यात राहू लागली. ”देशातली सर्वात लहान महिला आयपीएस म्हणून आज नितीशाचं कौतुक होत आहे, पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता.” अश्विनी जगताप सांगत होत्या. नितीशा लहानपणापासूनच अभ्यासू,हुशार जिद्दी. १० वी नंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला पण ११ वी संपतासंपताच मानव्य आणि सामाजिक विज्ञान शाखांची अधिक आवड असल्याची जाणीव झाली. १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर जेईई मेन्समध्ये अपयश आल्यावर मात्र कला शाखेकडे जाण्याचं निश्चित झालं. आईबाबांनी तिचा निर्णय अत्यंत सहजतेनं स्वीकारला. ”यशाकडे कसं बघायचं ते कोणाला सांगावं लागत नाही. पण अपयशाकडे कसं बघायचं हे मात्र लहानपणापासून शिकवावं लागतं.” अश्विनीताई सांगत होत्या. ”आजच्या काळाचा, मुलांच्या भावविश्वाचा विचार केला तर मुलांना अपयशाकडे सकारात्मक दृष्टीनं बघायला शिकवणं खूपच आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक कठीण काळात आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा विश्वास मुलांना द्यायला हवा. अपयश कितीही मोठं असलं तरी आपण मिळून ते पुसू आणि परत यशाचा प्रयत्न करू,

Read More

खेळाडू लक्ष्मीची पावलं उसतोडणीकडून पुन्हा तालमीत

लक्ष्मी सीताराम पवार. गेल्या वर्षी ओडिशात खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तरावरच्या कुस्ती स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती. तिचं स्वप्न ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं! पण कुटुंबाची ओढाताण लक्षात घेऊन त्यावर पाणी सोडण्याचा निर्णय तिनं घेतला. खेळाडूनं यश मिळवलं की त्याचं प्रचंड कौतुक पण उदयोन्मुख खेळाडूच्या गरजांकडे साफ दुर्लक्ष.. अशा आपल्या क्रीडा संस्कृतीत लक्ष्मीसारख्या असंख्य खेळाडूंना आपल्या स्वप्नावर पाणी सोडावं लागतंच! पण लक्ष्मीची गोष्ट इथेच संपत नाही. लक्ष्मी,लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या खानापूर तांडा इथली. सध्या ती लोहारा तालुक्यातल्या माकणी इथल्या बीएसएस महाविद्यालयात बीए तृतीय वर्षाला आहे. लहानपणापासूनच तिला कुस्तीची आवड. शाळेपासून विद्यापीठ, राज्यस्तरावर झालेल्या असंख्य स्पर्धा तिने जिंकल्या. घरच्यांनाही तिचं कौतुक. घरची बिनभरवशाची दोन एकर शेती. लक्ष्मीची जिद्द, चिकाटी पाहून तिची आवड पूर्ण करण्यासाठी आईबाबा, भाऊ अपार मेहनत घेणारे. ऑलिम्पिकसाठी तयारी करायची तर तशी तालीम, खुराक आणि प्रशिक्षक हवा. त्यासाठी बराच खर्च येणार असल्यानं लक्ष्मीच्या कुटुंबानं प्रयत्न केले. थोडीफार मदत लोकांनी केली. पण तीही अपुरीच पडत होती. लक्ष्मीलाही कुटुंबाच्या कष्टांची जाणीव होती. वास्तवाचं भान बाळगत तिनं निर्णय घेतला. आईबाबांसोबत उसतोडणीला जाण्याचा. खेळणं थांबवण्याचा…. ही गोष्ट मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना समजली. त्यांनी लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. गेल्या मंगळवारी, लोहारातल्या भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी लक्ष्मीचा सत्कार केला आणि तिच्या पुढच्या संपूर्ण खर्चाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. यावेळी प्रा. सतीश इंगळे, शहाजी मोहिते, हनुमंत कारभारी, प्राचार्य

Read More

जिद्दीतून आली समृद्धी

अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली. पदरी चार मुली, दोन मुले. पत्र्याच्या शेडचा मोडकातोडका आडोसा असलेलं घर. पावसाळ्यात अर्धा संसार पाण्याखाली. त्या म्हणतात, घर कसं चालवायचं अशी चिंता माझ्यापुढे होती. धुणी-भांडी करत होतेच. मग `राहत’ बचत गटाच्या बिनव्याजी कर्जातून शेळ्या घेतल्या. बचत गटाची साथ मिळाली. आता चार मुलींची लग्न करून दिली. मुलांना शिक्षण देतेय. मिरची कांडप मशिन, पिठाची गिरणी चालवून आनंदाने संसार करत आहे, खैरूण अभिमानाने सांगतात. शमा मन्सूर खान यांचं कपड्याचं दुकान. या व्यवसायापुरती जागाही त्यांच्याकडे नाही. तरीही पत्र्याच्या शेडमध्ये अुपऱ्या जागेत, आणि पैशांत योग्य नियोजन करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. साबेदा बेगम शेख यांच्या पतीचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. जगण्यासाठी काही उद्योग हवा होता. ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी लाकूड विक्री सुरू केली. आता रोज ५०० रुपयांची लाकूड विक्री करणाऱ्या साबेदा आनंदाने संसार करीत आहेत. ताहेराबी शेख यांना दोन मुले. गटाकडून कर्ज घेतले. आणि बांगड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावर संसार उभा राहिला आणि मुलंही शिकली. लैला यांचे पती अमिर शेख सेंट्रींगच्या कामावर रोजंदारी करीत होते. लैला यांनी ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेतले आणि पतीला बांधकाम क्षेत्रात गुत्तेदारी करण्यास प्रोत्साहित केले. अमिर सध्या गुत्तेदारी करतात. त्यांच्याकडे स्वत:चे भांडवल तयार झाले आहे. खैरूण, ताहेराबी, शमा या सगळ्या संसार उभा करण्यासाठी,

Read More

सत्तरीत-साठीत वृद्धाश्रम चालवणारे गहिनीनाथ आणि कौंताबाई

  उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या नळी वडगाव इथं एक गायरान जमीन आहे. तिथे पत्र्याची शेड असलेलं कुडाचं घर आहे. हा वृद्धाश्रम आहे. सत्तरीचे गहिनाथ दगडू लोखंडे हा वृद्धाश्रम चालवतात. गहिनीनाथांचं शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. चपला शिवणे, गवंडीकाम, टेलरिंग, ड्राइविंग अशी मिळेल ते काम करून त्यांनी आयुष्य काढलं. २०१३ मध्ये गहिनीनाथ केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला गेले होते. तिथे अचानक महाप्रलय आला. त्यातून ते सुखरूप बचावले. ही घटना त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरली. जवळून मृत्यू पाहिलेल्या गहिनीनाथ महाराजांनी उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करायचं ठरवलं. गहिनीनाथ महाराज सांगतात,”कामानिमित्त मुलं घर सोडून दूर नोकरीव्यवसाय करतात. उतारवयात खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते, पण त्याचवेळी आजूबाजूला विचारपूस करणारं कोणीच नसतं. त्यांना आधार देण्याची गरज होती.” २०१३ मध्येच त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृद्धाश्रम सुरू केला. . कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय. सुरुवातीला ३ जण असलेल्या या आश्रमात आता ३२ लोक राहतात. यात १३ महिला तर १९ पुरुष. यातील बहुतांश लोक निराधार. या वृद्ध लोकांचा सांभाळ गहिनीनाथ महाराज स्वतः करतात. यात त्यांच्या पत्नी कौंताबाई यांची अत्यंत मोलाची साथ आहे. कौंताबाईही साठीच्या आहेत. गहिनीनाथ महाराज रोज पहाटे पाच वाजता उठतात. वृद्धांना आंघोळ घालतात. सकाळी सात वाजता हरिपाठाने आश्रमाची सुरुवात होते. सर्वांना सकाळची न्याहारी देऊन गहिनीनाथ महाराज आश्रम चालवण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य घेण्यासाठी बाहेर पडतात. महिन्यातून एकदा सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी केली

Read More

लेकींचा माहेरासाठी ‘जाणीव जागर’, प्रयत्नातून बदलतंय गाव

विवाहानंतरही लेकींचा गावाबद्दलचा जिव्हाळा कायम असतो. पण, आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात त्या पुन्हा माहेरात रमू शकत नाहीत. मात्र, कळंब तालुक्यातील शेलगावमध्ये सासुरवाशीण झालेल्या लेकींनी आपल्या माहेरासाठी जाणीवेचा जागर सुरू केला आणि गावापासून दूर गेलेल्या या लेकींनी माहेरासाठी वृक्षलागवडीतून योगदान देण्यास सुरूवात केली आहे. या प्रयत्नातून गावात आतापर्यंत ९५ मोठ्या झाडांची लागवड झाली असून, ५०० हून अधिक फुलांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही लेकी योगदान देत आहेत. कळंब तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या शेलगाव(जहागीर) या गावात लेकींच्या प्रयत्नातून सामाजिक चळवळच उभारू पाहत आहे. विशेष म्हणजे गावातील तरूणही बहिणींच्या या उपक्रमात योगदान देत आहेत. माहेराला हरित बनविण्याचा लेकींचा संकल्प असून, पुढच्या टप्प्यात गावात प्रशस्त ग्रंथालय उभारलं जाणार आहे. गावची लेक असलेल्या सुवर्णा मधुकर शिनगारे-जवळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून आल्या. माहेरासाठी काहीतरी विधायक कार्य उभारण्याची संकल्पना त्यांच्या मनात होती. त्यातून गावात वृक्षलागवडीची संकल्पना त्यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी गावातल्या भावांना आणि सासुरवाशीण झालेल्या सर्व मुलींना ‘जाणीव जागर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एकत्र आणलं. प्रत्येक लेकीचा वाढदिवस माहेरात झाडे लावून झाला पाहिजे, ही संकल्पना सगळ्यांना आवडली. प्रत्येक लेकीने या उपक्रमासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सुरू झाली वृक्षलागवड. कुणी स्वत:च्या तर कुणी कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसाला शक्य तेवढ्या पैशातून वृक्ष लागवड करू लागल्या. लेकींनी सुरू केलेल्या उपक्रमाला गावातील तरुणांनी साथ दिली. नवीन सार्वजनिक ठिकाण निश्चित

Read More

माधवरावांच्या नातलगांनी सांगितलं, आम्हीही असंच लग्न करणार

”खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नात होणारी उधळपट्टी खरंच आवश्यक आहे का ?” माधवरावांचा प्रश्न विचार करायला लावत होता. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या उदतपूरचे माजी सरपंच माधवराव पाटील. प्रगतिशील शेतकरी अशीही त्यांची ओळख. त्यांचा मुलगा आत्मारामचं लग्न धानुरीतले प्रा. आनंदराव सूर्यवंशी यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी ठरलं. नोंदणी पद्धतीनं लग्न करायला दोन्ही कुटुंबांनी तयारी दर्शवली. त्यानुसार गेल्या महिन्यात ४ तारखेला नोंदणी पद्धतीनं लग्न झालं. संध्याकाळी आत्माराम यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम झाला. यावेळी माधवराव नोंदणी विवाहाबद्दल बोलले. ” आपल्या समाजात खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नात भरपूर पैसे खर्च केले जातात. यात शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आहेत. विचार करा, खरंच लग्नावर एवढा पैसा खर्च करणं आवश्यक आहे का ?नोंदणी विवाहाबद्दलचे गैरसमज दूर करा.” एवढंच नाही तर माधवरावांनी कार्यक्रमात २५ हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टला दिला. चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून. त्यांचे व्याही आनंदरावांनीही पूरग्रस्तांना २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पाटील आणि सूर्यवंशी कुटुंबाचं कौतुक केलं. नोंदणी पद्धतीनं विवाह ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद साळुंके, आण्णाराव पाटील, बापूराव पवार, गुंडेराव पवार, गोवर्धन मुसांडे, बालाजी पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिदास पवार, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, दीपक गोरे, अजित पाटील, किरण चिंचोले आले होते. माधवराव सांगत होते, ”कोरोना काळात

Read More

उस्मानाबादकरांची सायकल स्वारी, रायगडाच्या दरबारी

त्यांनी ठरवलं, प्रयत्न सुरू केले. दररोज सकाळी ५० ते ७० किलोमीटर सायकलिंगचा सराव सुरू झाला. कधी कोरेानाची लाट तर कधी कामाचा व्याप. तरीही, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच होती. शेवटी निश्चय आणि स्वप्नपूर्तीसाठी सारं बळ एकवटून त्यांनी किल्ले रायगडाच्या दिशेने सायकल स्वारी सुरू केली. उस्मानाबादपासून सुमारे ३८० किलोमीटरचं अंतर. घाट आणि वळण कापत ते १७ तरुण छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस्थळी पोहोचले. खरंतर सायकलरून साधारण ४०० किलोमीटर अंतर कापणं, २५ वर्षांपूर्वी कुतुहलाचं नव्हतं. आता मात्र दुचाकी, चारचाकी, अशा सुविधांचा वापर वाढला आणि त्याच वेगानं शारीरिक समस्यांची नांदी सुरू झाली. उस्मानाबाद तसा ग्रामीण भाग असला तरी इथंही सायकल वापराचा विसर पडत चाललेला. काही तरुणांनी एकत्र येत शहरी भागात रूजत असलेली मॅरेथॉनची संकल्पना पुढे आणली. दोन-तीन वर्षे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या मंडळींनीच पुढे सायकल वापराचा नवा संदेश उस्मानाबादकरांना दिला. व्यवसाय, नोकरी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या तरुणांनी सरावातून सायकल चालविण्याचे दररोज नवे उच्चांक केले. त्यांनी सायकलवरून रायगडपर्यंत म्हणजे सुमारे ३८० किलोमीटर जाण्याचा निर्धार केला आणि सुरू झाली तयारी. ८ जुलै रोजी पहाटे १७ जणांनी आपापल्या सायकलवरून रायगडाच्या दिशेने कूच केले. प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये सायकल वापराबद्दल जागृती करत तरूणांची फौज पुढे सरकत होती. चार दिवसांच्या मुक्कामानंतर रायगडावर पोहोचलेल्या तरुणांनी शिवरायांच्या पुतळ्याचं, पवित्र स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्ती झाली. खरंतर, हा प्रवास इथंच संपत

Read More

मनीषाला मिळाला ‘डेटॉल सॅल्यूट’

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातलं कसबे तडवळे. इथं राहणाऱ्या मनीषा वाघमारे या तरूणीची ही गोष्ट. मनीषाला समाजकार्याची आवड. कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच मनीषाने जागृती ग्रुप, पुणे आणि होप फाऊंडेशनसोबत काम सुरू केलं. उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यांमध्ये गरीब लोकांना अन्नधान्याचं कीट वाटप केलं. तर यावर्षी तिने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवण्याचं काम स्वखर्चातून केलं. दिवसभरात दीडशेहून अधिक लोकांना 30 किमी गाडी चालवत तिने रुग्णालयात डबे पोहोचवले. सुरुवातीला ती शंभर डबे देत होती. नंतर तिचं काम बघून लोकांनीच तिच्या कार्याला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे जेवणाचे डबे वाढवण्यात आले. खरंतर मनीषाच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. १६ वर्षांपूर्वी तिच्या वडलांचे निधन झालं. आई अंबिका वाघमारे या चप्पल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय डगमगला तरीही त्यांनी अन्नदानाचं काम सुरू ठेवलं आहे. या कामात आईसोबत माया आणि तेजल या बहिणींची मदत तिला कायम मिळते आहे. मनीषाच्या याच कामाची दखल डेटॉल या कंपनीने घेतली आहे. हँडवॉश उत्पादनावर ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या शीर्षकाखाली मनीषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती छापली आहे. मनीषा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला अधिकारी व्हायचं आहे. पुण्यातील तिचे काही मित्रमैत्रिणी हे सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत मनीषाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. संकटांना आणि परिस्थितीवर मात करत समाजकार्य करणार्‍या तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक

Read More